शिर्डीतील Grow More Scam:2025 |‘पैसा दुप्पट’ करण्याच्या आमिषाने लोकांची कोट्यवधींची फसवणूक! Victims Break Silence -lokmarathi.com

Grow More scam : महाराष्ट्रात गुंतवणूकदारांची फसवणूक करत १०% परताव्याचं आमिष दाखवत कोट्यवधी रुपये उडवले. आहिल्यानगर मध्ये शिर्डी ,श्रीगोंदा , पारनेर, सुपे, राहुरी तर नंदुरबार, नाशिकसारख्या जिल्ह्यांतील लोक याला बळी पडले. साधारण ३०० कोटी पेक्षाही खूप मोठा घोटाळा , गुंतवणूक च्या नावाखाली फसवणुकीबाबत सर्व माहिती येथे वाचा.

“१०% मासिक परतावा, पैसा ६ महिन्यांत दुप्पट” अशा वाक्यांमागे धावत हजारो लोकांनी आपल्या आयुष्यभराच्या मेहनतीची कमाई गुंतवली… पण ही होती एक फसवणुकीची जाळी. महाराष्ट्रात गाजत असलेला Grow More Investment Scam हा २०२५ मधील सर्वात मोठ्या गुंतवणूक घोटाळ्यांपैकी एक ठरत आहे.

Grow More scam
Grow More scam

Grow More Scam फसवणूक कशी झाली?

ग्रो मोर इन्व्हेस्टमेंट फायनान्स या कंपनीने सुरुवातीला नागरिकांना आकर्षक परतावा देत विश्वास संपादन केला. त्यानंतर लोकांना मोठ्या प्रमाणावर पैसे गुंतवायला प्रवृत्त केलं.
पण काही महिन्यांतच शिर्डीतील ऑफिस बंद, फोन बंद… आणि कंपनीचे सर्व संचालक गायब!

📖 सद्गुरू गंगागिरी महाराज सप्ताह २०२५ जाणून घ्या – येथे क्लिक करा →

Grow More scam आरोपी कोण?

Grow More scam या घोटाळ्याचा मास्टरमाइंड भूपेंद्र सावळे उर्फ भूपेंद्र पाटील असून, त्याच्यासह वडील राजाराम सावळे, तसेच संदीप, सुबोध सावळे, पूजा पोटींडे, अरुण नंदन यांच्यावरही फसवणुकीचे गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत.

Grow More scam कुठे गुन्हे दाखल झालेत?

आहिल्यानगर मध्ये शिर्डी ,श्रीगोंदा , पारनेर, सुपे, राहुरी, राहाता तसेच नंदुरबार, नाशिक, जळगाव अशा जिल्ह्यांमध्ये गुंतवणूकदारांची तक्रार वाढत आहे.
सध्या २२ गुंतवणूकदारांनी जवळपास १.७५ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार दिली असून, प्रत्यक्षात फसवणुकीची रक्कम कोट्यवधींच्या घरात गेली असल्याचं समोर आलं आहे.

पैसा दुप्पट’ स्कीमची खरी गोष्ट

  1. सुरुवातीला हप्ते वेळेवर देऊन विश्वास निर्माण करणे
  2. “१०% परतावा” व “दुप्पट रक्कम” याचं आमिष
  3. WhatsApp, Telegram वर बनावट screen-shots आणि success stories
  4. शेजारी, नातेवाईक, शिक्षक, राजकीय लोक यांच्यातून प्रचार
  5. अचानक कंपनी गायब – आणि गुंतवणूकदार थक्क!
Grow More scam

सोशल मीडियाचा फसवा वापर

Telegram आणि WhatsApp ग्रुपवर “मी ₹१० लाख गुंतवले आणि ६ महिन्यांत ₹१५ लाख मिळाले” अशा पोस्ट्सचा मारा होता. यामुळे सामान्य लोकांचा विश्वास अधिकच वाढला.

लोक बळी का पडले?

  • आर्थिक साक्षरतेचा अभाव
  • ओळखीच्या व्यक्तींकडून आलेल्या शिफारशी
  • बनावट कागदपत्र आणि ‘NBFC’ असल्याचा दावा
  • अधिक परताव्याच्या लालसेमुळे विचार न करता गुंतवणूक
📱 Samsung Galaxy Ultra – सर्वोत्तम ऑफर येथे मिळवा!

कायदेशीर कारवाई सुरू

पोलिसांनी Maharashtra Depositors Protection Act, 1999 अंतर्गत गुन्हे दाखल केले असून, अटक व मालमत्ता जप्तीची कारवाई सुरू आहे. मात्र, गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळतील की नाही, हे अद्याप निश्चित नाही.

सामान्य नागरिकांसाठी सल्ला

✔ १०% पेक्षा जास्त परतावा देणाऱ्या योजनांवर तुरुतुरु विश्वास ठेवू नका
✔ गुंतवणूक करण्यापूर्वी SEBI किंवा RBI नोंदणी तपासा
✔ सोशल मीडियावरील बनावट screen-shots आणि WhatsApp मेसेजेसकडे दुर्लक्ष करा
✔ आर्थिक सल्ला घेतल्याशिवाय मोठी गुंतवणूक करू नका
✔ फसवणूक झाल्यास त्वरित 1930 Cyber Helpline किंवा जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवा

Grow More Scam हे प्रकरण भारतीय गुंतवणूक संस्कृतीला दिलेला जोरदार इशारा आहे.
“जास्त परतावा म्हणजे मोठा धोका” हे आता सर्वांनी लक्षात घ्यायला हवं. आर्थिक व्यवहारांमध्ये माहिती, सतर्कता आणि साक्षरता हाच खरा बचाव आहे.

Grow More scam
Grow More scam

तुम्हीही अशी कोणती स्कीम पाहिली आहे का?

💬कॉमेंट करा, शेअर करा, आणि आपल्या ओळखीच्या लोकांनाही या गोष्टीबद्दल जागरूक करा!

📱 Samsung Galaxy M36 5G – 128GB, 8GB RAM

MRP: ₹21,999
Deal Price: ₹17,499   (Save ₹4,500 – 20% OFF)

🛒 Buy Now on Amazon

FAQ Section

Q1: Grow More scam म्हणजे काय?
A: ही एक बनावट गुंतवणूक योजना होती जी मासिक १०% परताव्याचं आमिष दाखवून लोकांकडून पैसे उकळायची. काही काळ पैसे देऊन विश्वास संपादन केल्यावर कंपनी गायब झाली.

Q2: गुन्हे कुठे दाखल झाले आहेत?
A: शिर्डी, राहाता, नंदुरबार, नाशिक व इतर जिल्ह्यांमध्ये पोलिसांत गुन्हे दाखल झाले आहेत.

Q3: फसवणुकीची रक्कम किती आहे?
A: आत्तापर्यंत जवळपास ₹1.75 कोटींची फसवणूक स्पष्ट झाली असून, प्रत्यक्षात ती कोट्यवधींच्या घरात असू शकते.

Q4: या स्कॅममधून काय शिकावं?
A: जास्त परताव्याचं आमिष म्हणजे धोका. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी कंपनीची SEBI/RBI नोंदणी आहे का, हे तपासा.

Leave a Comment