Nagar-Manmad Road वरचा असंतोष आता उंबरठ्यावर नाही – तो रस्त्यावर उतरला आहे.
शासनाच्या आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जगण्याच्या मूलभूत हक्कासाठी आता जनता रस्ता रोको आंदोलन करत आहे. Nagar-Manmad Road हा रस्ता कागदावर “राष्ट्रीय महामार्ग” आहे. पण प्रत्यक्षात तो मृत्यूचा मार्ग बनला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची अवस्था इतकी वाईट आहे की, नागरिकांना दररोजचा प्रवास म्हणजे जीवघेणा धाडस करावा लागतो.

हा रस्ता केवळ शहरांना जोडत नाही, तर तो उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांच्यामधील वाहतुकीचा एक महत्त्वाचा दुवा आहे. या रस्त्यावरून हजारो ट्रक, साखर वाहतूक, भाविकांची गाड्या, विद्यार्थ्यांची बस, व्यापारी वाहतूक आणि सामान्य प्रवासी रोज जातात. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की, सरकार आणि प्रशासन या रस्त्याकडे आजही दुय्यम दृष्टीने पाहत आहे.
📣 10 सप्टेंबर – रस्ता रोको आंदोलनाची हाक
रस्ता दुरुस्ती कृती समिती च्या वतीने आम्ही जाहीरपणे सांगतो —
बुधवार, दिनांक 10 सप्टेंबर, सकाळी 10.30 वा.
राहुरी फॅक्टरीतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ नगर-मनमाड महामार्गावर भव्य रस्ता रोको आंदोलन होणार आहे.
हे आंदोलन केवळ निषेध नाही, तर शेकडो बळी गेलेल्या नागरिकांच्या न्यायासाठीचा लढा आहे.
मराठा आरक्षणासाठी हैद्राबाद गॅझेटर आणि सातारा गॅझेटर – शासन निर्णय आणि प्रक्रिया⚠️ का करतेय जनता रस्ता रोको?
गेल्या आठवड्यात राहुरी व परीसारारील ४ निष्पाप नागरिकांचा याच रस्त्याने बळी घेतला आहे , आणि गेल्या कितेक वर्षापासून हा त्रास जनता सहन करत आहे, महारष्ट्रात समृद्धी सारखे महामार्ग होऊ शकतात मग हा मार्ग का नाही ! सदरचा Nagar-Manmad Road नॉर्थ भारत आणि साउथ भारत जोडणारा दुवा आहे , त्यात सर्वात मोठ्या अहिल्यानगर जिल्याचे दोन भाग जोडणारा असून उत्तर नगर मध्ये अद्यावत दवाखाने कमी आहेत मग बऱ्याच रुग्ण वाहिका ह्या नगर , पुण्याला जातात पण त्यांना या रस्त्यामुळे वेळेत पोहोचणे शक्य होत नाही . हा मार्ग अहिल्यानगरशी नाशिक , धुळे या जिल्याना जोडण्याचे काम करतो म्हणजे किती तरी कामाचा महामार्ग आहे, याच रस्त्यावर साईबाबा संस्थान , शनी शिगणपूर संस्थान रहदारी असते , भाविकांच्या प्रवासाचाही प्रश्न निर्माण होतो , तरी त्याची दुराव्स्ता का ? असा जनतेचा सवाल आहे …..
दररोजच्या प्रवासात नागरिकांनी काय सहन करायचं?
- खड्ड्यांमुळे अपघात,
- चुकीच्या कामामुळे होणारी वाहतूक कोंडी,
- आणि निकृष्ट दर्जाचे काम
यामुळे Nagar-Manmad Road म्हणजे “धोक्याचा मार्ग” बनला आहे.
ही परिस्थिती आता सहनशक्तीच्या पलीकडे गेली आहे.
आम्हाला रस्ता हवा – पण सुरक्षित आणि दर्जेदार!

✊ आंदोलनाच्या प्रमुख मागण्या:
- नगर-मनमाड महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत,
– जड वाहतूक (Heavy Vehicles) पर्यायी मार्गाने वळवावी.
– यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होईल आणि सामान्य प्रवाशांना दिलासा मिळेल. - रस्त्यावर पडलेले खड्डे तत्काळ बुजवावेत,
– नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी हे आवश्यक आहे.
– खड्डे विरहित, समतल रस्ता ही प्राथमिक आवश्यकता आहे. - काम सुरु असलेल्या ठिकाणी सूचना फलक / दिशादर्शक लावावेत,
– रस्त्यावर कोणते काम सुरू आहे, कुठे वळण आहे, हे नागरिकांना समजायला हवे. - Road Work Order, Drainage Plan जनतेपुढे सादर करावेत,
– सार्वजनिक पैशातून होणारे काम पारदर्शक असले पाहिजे.
– नागरिकांना माहिती मिळणं हे त्यांचं हक्काचं आहे.
📌 रस्त्याचे राजकारण – जनतेच्या जीवावर?
Nagar-Manmad Road वर गेली १० ते १५ वर्षे आंदोलनं, निवेदने, भेटीगाठी, आश्वासनं सुरू आहेत.
कित्येक वेळा टेंडर निघाले, काही वेळा सुरू असलेली कामं थांबली, पुन्हा नवी कंपनी आली… पण नागरिकांनी कधीच पूर्ण झालेला रस्ता पाहिला नाही.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वतः म्हटले की, या रस्त्याला विशेष लक्ष मिळालं नाही. मिळालं तेव्हा योग्य ठेकेदारच सापडला नाही.
आज काम सुरू आहे पण ते अति संथ गतीने, आणि तरीही ६ पदरी रस्त्याची मंजुरी असून देखील फक्त ४ पदरीच काम सुरू आहे. नागरिकांचा एकच प्रश्न आहे –
“मग आम्हाला दाखवलेलं स्वप्न खोटं होतं का?”
⚠️ रस्त्याची अवस्था – मृत्यूचा साक्षीदार
आजच्या घडीला Nagar-Manmad Road म्हणजे खड्ड्यांनी भरलेला, अर्धवट कामाने अडवलेला आणि अपघातांनी भरलेला मार्ग.
गेल्या काही वर्षांत शेकडो लोक या रस्त्यावर मृत्युमुखी पडले आहेत.
- कोणी बाईकवरून पडले
- कोणी ट्रकच्या खाली आले
- कोणी हॉस्पिटलपर्यंत वेळेत पोहचू न शकल्यामुळे प्राण गमावला
हे केवळ आकडे नाहीत – या मागे कुटुंबं उद्ध्वस्त झाली आहेत.
Nagar Manmad Road – हा रस्ता नाही, हा अन्यायाचा मार्ग आहे!

🙏 आमचं आवाहन – एकत्र या, आवाज उठवा
Nagar-Manmad Road फक्त एक मार्ग नाही — तो आमच्या रोजच्या जगण्याचा रस्ता आहे.
या रस्त्यावरून शिर्डीच्या साईबाबांपर्यंत पोहोचणं सोपं असावं,
या रस्त्याने साखर उद्योगाचे चाकं सुरक्षित फिरावीत,
या रस्त्याने कोणाचं आयुष्य थांबू नये — हाच आमचा प्रयत्न आहे.
या रस्त्यावरून शिर्डीचे साई भक्त, शनि शिंगणापूरचे भाविक, शेतकरी, महिला, विद्यार्थी , नोकरदार – सगळेच जातात.
हे आंदोलन केवळ आंदोलन नाही, हे जीवनासाठीचे सत्याग्रह आहे.
📢 म्हणून आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की,
१० सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता
राहुरी फॅक्टरी, शिवाजी महाराज पुतळा, Nagar-Manmad Road येथे
रस्ता रोको आंदोलनात सहभागी व्हा.
🙏 जनतेचा आग्रह – हा लढा आपण सगळ्यांनी एकत्र लढायचा
• Windows 11 Home | 1-Year Warranty
• Cloud Grey | 1.58 Kg | Model: 82VG00ESIN

