पोटभर खाऊनही वजन वाढणार नाही! 'हे' ११ फायबर रिच पदार्थ आजच डाएटमध्ये करा सामील.
pinterest
सकाळी नाश्त्याला ओट्स खाणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. यात असणारे विरघळणारे फायबर (Soluble Fiber) मुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि अवाजवी खाणे टाळता येते
pinterest
गव्हाच्या चपातीपेक्षा ज्वारी किंवा बाजरीची भाकरी वजन कमी करण्यासाठी भारी आहे. यातील फायबर पचनक्रिया सुधारते आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवते.
pinterest
'एक सफरचंद रोज खा आणि डॉक्टरांना दूर ठेवा' हे खरेच आहे. सफरचंदात पेक्टिन नावाचे फायबर असते, जे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करते.
pinterest
मूग, मटकी, चणे यांना मोड आणून खाल्ल्याने शरीराला भरपूर फायबर आणि प्रोटीन मिळते. यामुळे मेटॅबॉलिझम (Metabolism) वाढून वजन वेगाने कमी होते.
pinterest
वजनाचा काटा कमी करण्यासाठी चिया सीड्स रामबाण उपाय आहेत. पाण्यात भिजवून याचे सेवन केल्यास शरीराला भरपूर फायबर मिळते आणि पोटाचे आरोग्य सुधारते.
pinterest
या हिरव्या भाज्यांमध्ये कॅलरीज अत्यंत कमी आणि फायबर खूप जास्त असते. याचे सूप किंवा सॅलड खाल्ल्याने वजन नियंत्रित राहण्यास मोठी मदत होते.
pinterest
आपल्या रोजच्या वरणात आणि डाळींमध्ये फायबरचा मोठा साठा असतो. दुपारच्या जेवणात डाळींचा समावेश केल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि फॅट्स वाढत नाहीत.
pinterest
रताळ्यामध्ये फायबरसोबतच कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स असतात. बटाट्याला उत्तम पर्याय म्हणून रताळे खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
pinterest
या फळामध्ये पाण्याचे आणि फायबरचे प्रमाण खूप जास्त असते. वजन कमी करताना गोड खाण्याची इच्छा झाल्यास नाशपाती खाणे कधीही उत्तम.
pintrest
ओमेगा-३ फॅटी अॅसिड आणि फायबरने समृद्ध असलेल्या अळशीच्या बिया पोटाभोवतीची चरबी (Belly Fat) वितळवण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. `
pinterest
मूठभर बदाम किंवा अक्रोड खाल्ल्याने शरीराला फायबर आणि हेल्दी फॅट्स मिळतात. संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी हा उत्तम आणि पौष्टिक स्नॅक आहे.
pinterest
फायबरयुक्त पदार्थ खाताना दिवसातून ३ ते ४ लिटर पाणी पिणे खूप गरजेचे आहे, जेणेकरून फायबर व्यवस्थित पचेल.