Namoh Shetkari Yojana: Exciting Update | नमो शेतकरी योजना: 7 वा हफ्ता कधी मिळणार? | Reminder – Lokmarathi.com

Namoh Shetkari Yojana 2025 मध्ये नमो शेतकरी सन्मान योजनेचा सातवा हफ्ता लवकरच येणार आहे, राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. Pm kisan चा २००० चा हफ्ता येऊन २ महिने उलटले तरी नमो शेतकरी सन्मान निधीचा सातवा हफ्ता भेटला नाही, म्हणून सर्वत्र चर्चा पसरली होती कि हि योजना बंद झाली परंतु तसे नसून 3 सप्टेंबर रोजी शासन निर्णय झाला कि, महाराष्ट्र राज्य वित्त विभागाकडून कृषी विभागाची माघनी मंजूर झाली आहे. सदर योजनेची १९३२ कोटी रुपये वित्त आयुक्तालयाकडून मंजूर झाले आहेत, सोबत बऱ्याच नवीन व जुन्या शेतकऱ्यांची अडचणी दूर करून त्यांना आपण ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे.


महाराष्ट्र शासनाच्या नमो शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत राज्यातील पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपये आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. यामध्ये केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची ६,००० रुपये, आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेची अतिरिक्त ६,००० रुपये, असे मिळून वर्षाला १२,००० रुपये शेतकऱ्यांना दिले जातात.

Namoh Shetkari
credit printrest
Namoh Shetkari Yojana हप्त्याबाबत चांगली बातमी!

पावसाळी अधिवेशन चालू त्यात विरोधक या शेती मुद्द्यावर जास्त भर देत होते . त्यामुळे हे अधिवेशन झाल्यावर सरकार हि मदत देईल असे मध्यमामध्ये चर्चा होती कारण सद्या महाराष्ट्रातील सर्व शेतकरी २०२५ च्या खरीप हंगामची तयारी चालू होती मग खते , बी बियाणे , कीटक नाशके , मशागती , मजुरी असा खर्च लगेचच आहे म्हणून सरकार मदत करील अशी चर्चा होती, पण ते त्यानंतर २ महिने जाऊन हि भेटले नाही म्हणून जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला होता पन आता टी रक्कन कृषी आयुक्तालायाकडे होनार आहे १० लाखांहून अधिक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. पैसे DBT (Direct Benefit Transfer) च्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील.

Namoh Shetkari Yojana पात्रता:

अर्जदार शेतकरी महाराष्ट्रातील रहिवासी असावा.
नाव PM किसान पोर्टलवर नोंदणीकृत असावे.
बँक खाते Aadhaar लिंक झालेले असावे.
शेतीची नोंदणी ७/१२ उताऱ्यावर असावी.
शेतकरी २ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रधारक असावा.

आपले नाव यादीत आहे का? अशा प्रकारे तपासा:

1. pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
2. ‘Beneficiary Status’ पर्यायावर क्लिक करा.
3. आपला Aadhaar क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक टाका.
4. हप्त्यांची माहिती स्क्रीनवर दिसेल.

या वेळेस हप्त्यात कोणते अडथळे येऊ शकतात?

बँक खाते Aadhaar लिंक नसणे
PM किसान पोर्टलवर चुकीची माहिती
डुप्लिकेट अर्ज किंवा मृत शेतकऱ्यांचे नाव अद्याप न हटवलेले

👉 असे असल्यास तालुका कृषी कार्यालयात किंवा CSC केंद्रावर संपर्क साधा.

Namoh Shetkari
Namoh Shetkari

७ वा हफ्ता हा शासनाचा १५ -१६ सप्टेबर ला एक उपक्रम / कार्यक्रम चालू होणार आहे त्या दिवशी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची दाटशक्यता आहे असे सूत्रांकडून समजले आहे.

✍️ संपादकीय निरीक्षण:

नमो शेतकरी सन्मान योजना ही केवळ आर्थिक मदत नाही, तर शेतकऱ्यांप्रती असलेली राज्य सरकारची बांधिलकी दर्शवणारी योजना आहे. उन वारा पाउस असे बदलणारे हवामान आणि शेतोमधील आव्हाने हे सर्व सहन करून हि शेतकरी न डगमगता पुन्हा उभा राहतो आणि सर्व जगाला अन्न पुरवतो त्या शेतकाऱ्याचा , आपल्या बलीराज्याचा सन्मान हा एक छोटा सा का होईना पण आपले शासन करण्याचा प्रयंत्न करते म्हणूनच ७ वा हफ्ता लवकर मिळणे ही निश्चितच दिलासादायक बातमी आहे. मात्र अजूनही अनेक शेतकरी माहितीअभावी योजनेपासून वंचित राहतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी नियमितपणे आपली माहिती अपडेट ठेवणे आवश्यक आहे.

| घटक | माहिती |
| —————– | —————————————- |
| योजना नाव | नमो शेतकरी सन्मान योजना |
| हप्त्यांची संख्या | वर्षात ३ हप्ते |
| सध्या कोणता हफ्ता | ६ वा हफ्ता |
| रक्कम | ₹२,००० (प्रत्येक हफ्ता) |

अर्ज प्रक्रिया

Namoh Shetkari
  • पात्र शेतकऱ्यांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा.
  • अर्ज सादर केल्यानंतर, त्याची स्थिती तपासण्यासाठी वेबसाइटवर जाऊन माहिती मिळवता येईल.

महत्त्वाची सूचना

  • शेतकऱ्यांनी त्यांच्या बँक खात्याची नियमित तपासणी करावी.
  • अधिकृत घोषणांसाठी सरकारच्या वेबसाइटवर नियमितपणे भेट द्या.

https://pmkisan.gov.in

टोल फ्री नंबर 1800-180-1551

🌟 सुधारित पिक विमा २०२५ – नवीन सुविधा! 🌟

पिक विम्याची संपूर्ण माहिती मिळवा!

शेतकऱ्यांसाठी नवीनतम सुविधा व फायदे जाणून घ्या!

Leave a Comment