HSRP नंबर प्लेटसाठी 3 महिन्यांची मुदतवाढ – अंतिम संधीची नवी तारीख जाहीर! good news | lokmarathi.com

HSRP नंबर प्लेटसाठी अंतिम मुदत वाढवली; नवी तारीख जाहीर!

महाराष्ट्र शासनाने High Security Registration Plate बसवण्यासाठी 15 ऑगस्ट 2025 ही अंतिम तारीख निश्चित केली होती. मात्र, या महत्त्वाच्या मुदतीच्या अगदी जवळ येऊनही, सुमारे 70% वाहनधारकांनी अद्याप High Security Registration Plate साठी अर्ज केलेला नाही, अशी माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्र सरकारने जुन्या वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट (High Security Registration Plate) बसवण्याची अंतिम तारीख वाढवली आहे. यामुळे वाहनधारकांना या कायदेशीर प्रक्रियेसाठी अधिक वेळ मिळणार आहे.

HSRP
High Security Registration Plate notify by Gov.

HSRP म्हणजे काय?

HSRP (High Security Registration Plate) या विशेष प्रकारच्या नंबर प्लेट्स असतात. त्यात बारकोड, युनिक कोड आणि सिक्युरिटी चिप असते, ज्यामुळे वाहन ओळखणे आणि ट्रॅक करणे अधिक सोपे होते.


High Security Registration Plate चे फायदे:

  1. वाहन सुरक्षा: चोरी झालेल्या वाहनांचा शोध घेणे सुलभ होते.
  2. स्पष्ट ओळख: वाहतूक नियम उल्लंघन करणाऱ्यांची सहज ओळख पटते.
  3. कायदेशीर पालन: कायद्यानुसार HSRP लावणे आता बंधनकारक आहे.
  4. दंड टळतो: HSRP नसेल तर दंड होऊ शकतो.

🛒 D-Mart बद्दल आश्चर्यकारक तथ्य!

तुम्हाला माहितीय का, D-Mart चा यशस्वी प्रवास आणि त्यामागचं रहस्य काय आहे? जाणून घ्या D-Mart बद्दल १०+ जबरदस्त आणि रोचक गोष्टी ज्यांनी त्याला ग्राहकांचा आवडता ब्रँड बनवलं!

👉 संपूर्ण माहिती वाचा


High Security Registration Plate
कशी लावावी?

  1. नोंदणी: स्थानिक RTO किंवा अधिकृत वेबसाइटवर HSRP साठी नोंदणी करा.
  2. कागदपत्रे: वाहनाची नोंदणी प्रमाणपत्र, ओळखपत्र, विमा कागदपत्र इत्यादी तयार ठेवा.
  3. फी भरणे: वाहनप्रकारानुसार शुल्क भरा.
  4. प्लेट मिळवणे आणि बसवणे: नोंदणीनंतर अधिकृत केंद्रावरून प्लेट मिळवा व बसवा.

अंतिम मुदत वाढवण्याची कारणे:

  • नागरिकांना अधिक वेळ मिळावा
  • प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी
  • जागरूकता वाढवण्याची गरज
  • कायदेशीर व सुरक्षित प्रवास सुनिश्चित करणे

आवश्यक कागदपत्रे:

  • वाहन नोंदणी प्रमाणपत्र (RC)
  • ओळखपत्र (आधार, PAN, इ.)
  • वैध विमा प्रमाणपत्र

राज्यात वाहनांवर उच्च सुरक्षा क्रमांक (High Security Registration Plate) बसवण्याच्या मुदतीत परिवहन विभागाने पुन्हा वाढ केली आहे. यापूर्वीची अंतिम तारीख 15 ऑगस्ट 2025 होती, मात्र वाहनधारकांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने ती वाढवून आता 30 नोव्हेंबर 2025 करण्यात आली आहे.

✦ 70% वाहनांना अद्याप HSRP नाही

राज्यात 1 एप्रिल 2019 पूर्वीची तब्बल 2 कोटी 54 लाखाहून अधिक जुनी वाहने आहेत. यातील फक्त 49.89 लाख वाहनांवर
High Security Registration Plate
बसवण्यात आली आहे. अंदाजे 10% वाहनधारकांनी वेळ घेऊन नोंदणी केली असली, तरी अजूनही सुमारे 70% वाहनांना High Security Registration Plate बसवायची बाकी आहे.

✦ नागरिकांना दिलासा, पण अंतिम संधी

वाहनधारकांनी वेळेत नोंदणी न केल्याने आणि फिटमेंट सेंटरवर गर्दी वाढल्यामुळे सरकारने ही मुदतवाढ दिली आहे. मात्र ही अंतिम मुदत मानली जात आहे आणि यापुढे पुन्हा मुदतवाढ होण्याची शक्यता कमी आहे.

✦ कायद्यानुसार कारवाई होणार?

परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी यापूर्वी स्पष्ट केलं होतं की, 15 ऑगस्टनंतर High Security Registration Plate नसलेल्या वाहनांवर कायद्यानुसार दंडात्मक कारवाई केली जाईल. ही कारवाई पुढे ढकलली असली तरी, 30 नोव्हेंबरनंतर ती अटळ ठरणार आहे.

✦ जिल्हानिहाय प्रगती

High Security Registration Plate बसवण्यात सिंधुदुर्ग जिल्हा (MH-08) आघाडीवर असून 33% वाहनांवर प्लेट बसवण्यात आली आहे. त्यानंतर वर्धा, नागपूर ग्रामीण, सातारा आणि गडचिरोली जिल्ह्यांचा क्रमांक लागतो.


HSRP
High Security Registration Plate

नागरिकांसाठी सूचना:

  • High Security Registration Plate नोंदणीसाठी लवकरात लवकर अधिकृत पोर्टल किंवा RTO शी संपर्क साधा.
  • अंतिम तारीखपूर्वी नंबर प्लेट बसवणे टाळू नका.
  • वेळेत कृती न केल्यास दंड व कायदेशीर अडचणींना सामोरे जावं लागू शकतं.

महाराष्ट्रात High Security Registration Plate लावण्याची अंतिम तारीख आता 30 एप्रिल 2025 आहे. वाहनधारकांनी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करून दंड व गैरसोयीपासून बचाव करावा.

🔗 अधिक माहितीसाठी: [आपल्या स्थानिक RTO कार्यालयाशी संपर्क साधा किंवा अधिकृत वेबसाईटवर भेट द्या.]


💥ऑफ सीझन धमाका! 💥

Best Off on ACs

🌬️ TCL Elite Smart!

ह्या संधीचा फायदा घेऊन AC घरी घेऊन या आणि !
📦खूप मोठी बचत करा!
📦 डिस्काउंट आणि ऑफर्सचा पाऊस!

ऑर्डर करा आत्ताच 🚚

Leave a Comment