Shirdi Airport : शिर्डी विमानतळाच्या विस्तारित विकासकामांबाबत मुख्यमंत्री मा. देवेंद्रजींच्या प्रमुख उपस्थितीत बैठक…भक्ती सोबत शक्ती वाढवणारी बातमी : कृषी आणि व्यापार यांना चालना मिळणार
शिर्डी विमानतळाचा विस्तार आणि आधुनिकीकरण – कुंभमेळ्याच्या प्रवाशांसाठी महत्त्वाचा टप्पा, शिर्डी विमानतळाच्या विस्तारित विकासकामांचा आढावा मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री मा.श्री. अजितदादा पवार यांचीही उपस्थिती होती.तसेच जिल्हाचे पालक मंत्री ,जलसंपदा मंत्री आपले लाडके नामदार मा.श्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते

महाराष्ट्रात येणार्या नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी विमानतळावर सुरू असलेल्या विकासकामांना वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या कामाचे नियोजन, वेगवान अंमलबजावणी आणि वेळेवर पूर्णता याकडे प्रशासनाने विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. , ज्यांनी विमानतळाच्या प्रगतीवर आपली चर्चा मांडली आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचा आश्वासन दिला.
Table of Contents
Shirdi Airport –शिर्डी विमानतळाचा कुंभमेळ्यासाठी कलात्मक वेगळेपणा
शिर्डी विमानतळ येथे येणारे लाखो भाविक आणि पर्यटकांसाठी उत्कृष्ठ सेवा देणारे आहे. आता साईंबाबांच्या दर्शनी भाविकांसाठी विमानतळावर आधुनिक टर्मिनल, नव्या टेकऑफ आणि लँडिंग रनवे, तसेच प्रवाशांसाठी सोयीस्कर सुविधा यांचा विकास करण्यात येत आहे. शिर्डी विमानतळाचा वेळेवर विस्तार केल्यास कुंभमेळ्याच्या गर्दीच्या काळात प्रवास अधिक सुलभ आणि सुरक्षीत होण्यास मदत होईल.
शिर्डी विमानतळाचा विस्तार हा शिर्डी आणि परिसरासाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा असून शिर्डीची हवाई कनेक्टिविटी आणखी मजबूत होणार आहे. याचा फायदा जसा शिर्डीत येणाऱ्या भाविकांना होणार आहे, तसाच तो व्यापारी आणि कृषी क्षेत्रालाही होणार आहे. म्हणूनच नामदार राधाकृष्ण विखे पाटील विमानतळाच्या विस्तारासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहेत.
Shirdi Airport : मुख्यमंत्री फडणवीस यांचे कठोर आदेश :
नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी विमानतळ पूर्ण क्षमतेने सज्ज होण्याच्या हेतूने नुतनीकरण तसेच विस्तारीकरण कामे लवकर पूर्ण करावीत .
नुतनीकरण व विस्तारीकरणासाठी अतिरिक्त मनुष्यबळ नियुक्त करावे, आवश्यक खरेदी , स्ट्रक्चर डिझाइन ची कामे आठवड्यात पूर्ण करावीत.
शिर्डी विमानतळ विस्तारीकारांसाठी अतिरिक्त जमीन खरेदी करावी जेणे करून लहान विमानांना पार्किंग ची सुविधा होईल जवळील मुंबई विमानतळ ची अतिरिक्त विमान शिर्डी विमानतळावर पार्किंग करता येतील.
अश्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रशासनाला दिल्या त्यात कुठलीही दिरंगाई नको अस सूचित केले.
- Shirdi Airport विविध भागांतील कामांवर देखरेख
- Airport नवीन टेकऑफ व लँडिंग पट्टीचे काम
- Airport पॅसेंजर टर्मिनल बिल्डिंगचा विकास
- Airport व्हीआयपी व जनसामान्यांसाठी सुविधा वाढविणे
- Airport सुरक्षेच्या दृष्टीने नव्या यंत्रसामग्रीची व्यवस्था
- Airport वाहतूक आणि पार्किंग व्यवस्थेतील सुधारणा
ही महत्त्वाकांक्षी योजना हाताळण्यासाठी जिल्हा प्रशासन, महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरण आणि कंत्राटदार संस्था संयुक्तपणे काम करत आहेत. खासकरून जिल्हाचे पालक मंत्री ,जलसंपदा मंत्री आपले लाडके नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सक्रिय सहभागामुळे कार्यवाहीमध्ये योग्य दिशा आणि वेग आलेला आहे.
शिर्डी विमानतळाचा वेगाने विकास होऊन तो कुंभमेळ्याच्या निमित्ताने प्रवाशांना उत्तम सेवा देईल, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन काम करत आहे. कुंभमेळ्यापूर्वी शिर्डी विमानतळाची कामे पूर्ण होण्याचा निश्चित विश्वास असून, ह्यामुळे पर्यटक आणि भाविकांच्या प्रवासात मोठी सोय होईल.
“शिर्डी विमानतळ हे कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनाचा अविभाज्य भाग आहे, त्यामुळे कामाला कोणताही विलंब झाला तर तो मोठा फटका ठरेल,” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.