Sujay vikhe patil : लोकमाणसातील नेता: डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा प्रवास 2026 | Inspiring leader

Sujay vikhe patil

राम राम पाव्हणं! आज आपण अशा एका गड्याबद्दल बोलणार हाय, (Sujay vikhe patil) ज्याच्या नावाचा डंका नुसता नगर जिल्ह्यातच न्हाई, तर पार दिल्लीच्या तख्तापर्यंत गाजतोय. राजकारण म्हणलं की लय राडे आले, लय उलथापालथ आली, पण या सगळ्या राड्यात आपला पाय घट्ट रोवून उभा असलेला गडी म्हणजे सुजय विखे पाटील. आता तुम्ही म्हणाल, विखे पाटलांचं घराणं तर लय मोठं, मग ह्यात नवीन काय? तर गड्यांनो, वारसा मिळणं सोपं असतं, पण तो वारसा खांद्यावर घेऊन लोकांच्या मनावर राज्य करणं लय कठीण असतंय. आणि हेच कसब सुजय विखे पाटील यांनी साध्य केलंय.

सहकाराचा मिळालेला वारसा आणि मातीशी असलेले घट्ट नाते (Sujay vikhe patil)

ज्या मातीने आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना पाहिला, त्याच मातीत सुजय विखे पाटील यांचा जन्म झाला. पदवी घेतली डॉक्टरची, पण प्रॅक्टिस केली ती सामान्यांच्या वेदनेवर. जेव्हा एखादा शिकलेला सवरलेला पोरगा परदेशातून येतो, तेव्हा लोकं म्हणत्यात हा आता काय एसीत बसून कारभार करणार. पण सुजय विखे पाटील यांनी स्टेथोस्कोप बाजूला ठेवून जनसेवेचा अंगरखा चढवला. लोणीच्या दवाखान्यात जेव्हा ते रुग्ण तपासायचे, तेव्हाच त्यांना कळलं होतं की, इथल्या माणसाचं दुखणं फक्त शरीराचं नाही, तर व्यवस्थेचं सुद्धा हाय.

मैदानातली एन्ट्री आणि विरोधकांची दाणादाण!

२०१९ च्या निवडणुकीचा तो काळ आठवा. सगळीकडे चर्चा होती की विखे पाटील काय करणार? तेव्हा सुजय विखे पाटील यांनी एक असा ‘डाव’ टाकला की समोरच्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आणि नगरच्या राजकारणाची समीकरणं मुळापासून बदलून टाकली. लोक म्हणायचे की हा पोरगा काय लढणार? पण दादांनी रान पेटवलं. गावागावात, वाड्या-वस्त्यांवर जाऊन त्यांनी असा संवाद साधला की लोकांसाठी ते ‘खासदार’ नाही तर प्रत्येक घरचा ‘सुजय दादा’ झाले.

सुजय विखे पाटील यांच्या कामाची स्टाईल म्हणजे एकदम ‘ऑन द स्पॉट’. कामात चंगळ नको आणि फायलीत घोळ नको, हा त्यांचा सांगावा असतो. जिल्ह्याचा कोणताही प्रश्न असो, मग तो निळवंडे धरणाच्या पाण्याचा असो किंवा नगरच्या रेल्वेचा, दादांनी केंद्रात जाऊन टेबल ठोकून आपलं हक्काचं काम पदरात पाडून घेतलंय.

सुजय विखे पाटील

शेतकऱ्याचा सखा आणि दुष्काळाचा काळ!

नगर जिल्हा म्हणजे पावसाची ओढ असलेला भाग. इथल्या शेतकऱ्याच्या डोळ्यातलं पाणी पुसण्याचं काम सुजय विखे पाटील यांनी नेहमीच केलंय. पीक विम्याचा घोळ असो किंवा दुधाचा दर, जेव्हा जेव्हा बळीराजा संकटात आला, तेव्हा दादा धावून गेलेत. ते फक्त भाषणं ठोकत नाहीत, तर थेट मंत्रालयात जाऊन अधिकाऱ्यांची शाळा घेतात. “आमच्या शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे,” हा त्यांचा अट्टाहास असतो. सुजय विखे पाटील यांना माहिती आहे की, जोपर्यंत वावरातला शेतकरी हसत नाही, तोपर्यंत गावचा विकास होणार नाही.

तरुणाईचा क्रेझ आणि ‘विखे ब्रँड’!

आज तुम्ही नगरच्या कोणत्याही कट्ट्यावर जा, तिथं तुम्हाला सुजय विखे पाटील यांच्या कामाची चर्चा ऐकायला मिळेल. तरुणांमध्ये दादांची लय क्रेझ हाय. त्याचं कारण म्हणजे त्यांचं ‘कनेक्ट’. ते तरुणांशी त्यांच्याच भाषेत बोलतात. शिक्षण असो की नोकरी, पोरांना दिशा दाखवण्याचं काम दादांच्या संस्थांच्या माध्यमातून होतंय. पण राजकारण करत असताना त्यांनी कधीही ‘खोट्या वल्गना’ केल्या नाहीत. जे शक्य हाय तेच बोलणार आणि जे बोललंय ते करूनच दाखवणार, ही सुजय विखे पाटील यांची ओळख बनली आहे.

📖 सुजयदादा विखे पाटील यांच्याबद्दल अधिक माहिती हवी आहे का?

सुजयदादा विखे पाटील यांचे राजकीय प्रवास, कार्य आणि संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर Wikipedia वर सविस्तर माहिती उपलब्ध आहे. अधिक माहिती वाचण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.

👉 सुजयदादा विखे पाटील यांच्याबद्दल अधिक वाचा (Wikipedia)

राजकारण गेलं चुलीत, आधी माणुसकी!

काही लोकं म्हणतात विखे पाटील म्हणजे सत्ता. पण गड्यांनो, सत्ता तर येते आणि जाते, पण लोकांचं प्रेम कमावणं ही खरी कमाई हाय. सुजय विखे पाटील यांनी राजकारणापलीकडे जाऊन मैत्री जपली. समोरचा माणूस कोणत्याही पक्षाचा असो, जर तो मदतीसाठी आला तर दादा त्याला रिकाम्या हाताने धाडत नाहीत. नगरच्या मातीत जो संस्कार विठ्ठलराव विखे पाटलांनी पेरला, तोच संस्कार सुजय विखे पाटील मोठ्या अभिमानाने पुढे नेतात.

प्रवरा कोविड सेंटर – नगरच्या ग्रामीण भागातील लोकांसाठी तो काळ लय कठीण होता. सरकारी यंत्रणा थकत असताना विखे पाटलांच्या संस्थेमार्फत (प्रवरा) जे जेवण, औषधं आणि बेड मिळाले, त्यामुळं सामान्यांना मोठा आधार मिळाला होता. स्वतः डॉक्टर असल्यानं त्यांना मेडिकल इर्मजन्सीचं गांभीर्य लवकर लक्षात आलं.

आज जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात रस्ते चकाचक होतायत, पुलांची कामं होतायत, हे सगळं काय आपोआप होत नसतंय. यामागे सुजय विखे पाटील या माणसाचा पाठपुरावा असतो. दिल्लीत गेल्यावर इंग्रजी आणि हिंदीत बोलणारा हा माणूस जेव्हा नगरच्या मातीत येतो, तेव्हा तो अस्सल गावरान भाषेत लोकांशी गप्पा मारतो. हा जो ‘डाऊन टू अर्थ’ स्वभाव आहे ना, तोच त्यांना इतरांपेक्षा वेगळं ठरवतो.

भविष्याचा वेध आणि विकासाचा रथ!

आता येणारा काळ हा आव्हानांचा आहे, पण सुजय विखे पाटील यांच्यासारखा खंबीर नेता पाठीशी असताना नगरकरांना काळजी करण्याची गरज नाही. त्यांनी जिल्ह्यासाठी जे व्हिजन ठेवलंय, ते खरंच कौतुकास्पद हाय. केवळ राजकारण म्हणून नाही, तर एक सामाजिक जबाबदारी म्हणून ते प्रत्येक प्रश्नाकडे बघतात.

तर पाव्हणं, हे होते आपले सुजय विखे पाटील. कामात वाघासारखा दरारा आणि मनात सामान्य माणसासाठी अपार माया. नगरच्या राजकारणातला हा असा मोहरा आहे, जो येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात अजून मोठी मजल मारणार आहे, हे नक्की!

सुजय विखे पाटील यांनी दाखवून दिलंय की, जर तुमची नियत साफ असेल आणि कामाची धमक असेल, तर लोकं तुम्हाला नक्कीच साथ देतात. विखे पाटलांच्या घराण्याचा हा वारसा दादांनी असा काही फुलवलाय की, आज नगर जिल्ह्याची ओळख त्यांच्या कामाने होतेय.

सुजय दादा लोकसभेमध्ये आपल्या मतदारसंघातील प्रश्न मांडतानाचा विडिओ

तर मग गड्यांनो तुम्हाला पुढच्या शनिवारी अजून कोणत्या नेत्याबद्दल वाचायला आवडेल हे कंमेंट करून नक्की सांगा

🚩 गुढीपाडवा 2026 ची माहिती शोधत आहात का?

गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा पहिला दिवस असून 2026 मध्ये हा सण 19 मार्च 2026 रोजी साजरा केला जाणार आहे. जर तुम्हाला गुढीपाडवा 2026 मुहूर्त, पूजा विधी, शुभ वेळ याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर खालील लिंकवर क्लिक करा. तसेच सुंदर गुढीपाडवा रंगोळी डिझाईन पाहण्यासाठीही एकदा जरूर भेट द्या.

👉 गुढीपाडवा 2026 मुहूर्त जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाची सूचना (Disclaimer)

“हा लेख कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रचार किंवा कोणा एका विशिष्ट विचारधारेचे समर्थन करण्यासाठी लिहिलेला नाही. नगर जिल्ह्याच्या विकासात आणि विशेषतः कोविड-१९ सारख्या जागतिक संकटाच्या काळात डॉ. सुजय विखे पाटील यांनी एक ‘लोकप्रतिनिधी’ आणि ‘डॉक्टर’ म्हणून जे कार्य केले, त्याचा वस्तुनिष्ठ आढावा आणि माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे हाच यामागचा मुख्य उद्देश आहे. सदर मजकुरातील भाषा ही स्थानिक रांगडी (गावरान) बोलीभाषेचा वापर करून केवळ संवादात्मक शैलीत मांडली आहे. यातील माहिती ही उपलब्ध सार्वजनिक संदर्भ आणि सामाजिक कार्यावर आधारित आहे. वाचक आणि सुज्ञ नागरिकांनी याकडे केवळ एक माहितीपर लेख म्हणून पाहावे ही विनंती.”

Author

Blogger Nitin

नमस्कार माझं नाव नितीन आहे, आणि मी एक Blogger आणि Content Writer आहे. मला IT क्षेत्रात ६+ वर्षांचा अनुभव आहे. मी २०२३ पासून ब्लॉगिंग क्षेत्रात काम करायला सुरवात केली आहे. मी ट्रेंडिंग टॉपिक आणि फॅक्टस संबंधी content write करतो तसेच मी Freelancer म्हणून देखील काम करतो.

1 thought on “Sujay vikhe patil : लोकमाणसातील नेता: डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा प्रवास 2026 | Inspiring leader”

  1. Tausif Shaikh

    ​नाद खुळा लेख! सुजय दादा म्हणजे नगरच्या राजकारणातला खरोखरच ‘ब्रँड’ हाय. विकासाचा रथ असाच पुढे जात राहो. पुढच्या शनिवारी आम्हाला नितीन गडकरी साहेबांच्या कामाबद्दल वाचायला आवडेल. जबरदस्त सादरीकरण!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top